मान्सून उत्तरेकडे सरकला तरी उसंत नाही

Foto
दोन तीन दिवस संततधार?
जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेला मान्सून क्षणाचीही उसंत न घेता अजूनही सक्रिय आहे. विशेषतः मराठवाड्यावर आभाळमाया करीत मान्सूनने सर्व जिल्ह्यांना ओलेचिंब करून सोडले. गेल्या दोन दिवसात मान्सून वेगाने उत्तरेकडे सरकला असला तरी येत्या दोन दिवसात सर्व जिल्ह्यात सतत धार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काहीसा विसावलेला पाऊस दुसर्‍या आठवड्यापासून पुन्हा सुरू झाला.  आता तर गेल्या आठवडाभरापासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सूर्यदर्शनही झालेले नाही. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यात गेल्या 13 जून पासून सलग पाऊस कोसळत आहे. या सततधार पावसाने खरीप पिकांवर अनिष्ट परिणाम होत असून मूग उडीद यासारखी पिके खराब झाली आहेत. तर कपाशी आणि मका या नगदी पिकांवरही मर या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आह. पिकांच्या मशागती झाल्याने आणि चांगल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाने उघडीप दिल्यास फायदा होईल असे बोलले जाते. मात्र अजून तरी दोन-तीन दिवस सलग पाऊस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता मात्र वाढली आहे.
ते म्हणाले, मान्सूनने अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. उत्तरेकडे मात्र वेगाने सरकत असल्याचे दिसते. असे असले तरी अजूनही दोन-तीन दिवस औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.